पाऊस व खड्डयांमुळे डॉ.आंबेडकर चौक वाहतूकीस धोकादायक

सांगवी फाटा,नवी सांगवी, जुनी सांगवीला जोडणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक खड्डेमय झाल्याने वाहतूकीस धोकादायक ठरत आहे.
Due to rain and potholes Dr Ambedkar Chowk dangerous for traffic transportation sangvi
Due to rain and potholes Dr Ambedkar Chowk dangerous for traffic transportation sangvisakal

जुनी सांगवी : सांगवी फाटा,नवी सांगवी, जुनी सांगवीला जोडणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक खड्डेमय झाल्याने वाहतूकीस धोकादायक ठरत आहे. सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरवकर सांगवी फाटा औंध पुणे व पिंपरी-चिंचवड शहराकडे ये जा करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.हा प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चौकात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना येथून कसरत करावी लागत आहे.याचबरोबर उतार रस्ता व चौक असल्याने पावसाच्या पाण्याने रात्रीच्या वेळेस खड्डे नजरेस येत नसल्याने अनेकदा येथे दुचाकी वाहने घसरून अपघाताचा धोका वाढला आहे.

सेवा वाहिन्या टाकण्यासाठी महाराष्ट्र बॅंक चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या भागात दुतर्फा केलेल्या खोदकावर तात्पुरता माती मुरूम टाकल्याने पाचचा-यांना चालायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.पावसामुळे माती रस्त्यावर येत असल्याने पादचारी नागरिकांना यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.महाराष्ट्र बॅंक शितोळे नगर या चौकात वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेला चर तुटलेला गतिरोधक यामुळे नागरिकांना रहदारी साठी कसरत करावी लागत आहे.तात्काळ या सर्व ठिकाणांची खड्डे दुरूस्ती करण्यात यावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणावर रहदारी असते.नागरिकांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागतो.तात्पुरत्या डागडूज्या तकलादू ठरतात.पावसाआधी येथील खड्डे बुजवणे अपेक्षित होते.

-प्रशांत शितोळे माजी नगरसेवक

महाराष्ट्र बॅंक चौक शितोळे नगर हा प्रमुख चौक असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते.बाजारपेठेसह बॅंकेत येणारे नागरिक,ज्येष्ठांना कोंडीचा सामना करावा लागतो.

-कैलास बनसोडे अध्यक्ष ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन

पावसाच्या उघडीपीनंतर आंबेडकर चौक ते सांगवी फाटा या रस्त्यावरिल खड्डे दुरूस्ती करण्यात येईल. सध्या सर्वच भागात खड्डे दुरुस्ती करण्यात येत आहे.या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण कामाचे टेंडर मंजूर झालेले आहे.यात सेवा वाहिन्या टाकणे, सिमेंट कॉंक्रीटीकरण असे काम होणार आहे.

- विजय कांबळे अभियंता स्थापत्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com