Green Ganeshotsav : पिंपरीतील ‘झेप’ पुनर्वसन केंद्रातील विशेष मुलांनी साकारलेल्या गोमय गणेशमूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंमधून सणाला सामाजिक व पर्यावरणीय भान मिळाले आहे.
पिंपरी : गाईचे शेण आणि मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती, गणेशाच्या सजावटीसाठी कापडी आसन, लोड आणि बॅकड्रॉप, लोकरीचे तोरण, फुलांच्या माळा, पान सुपारी, रांगोळी असे एक ना अनेक प्रकार साकारले जात आहेत पिंपरीतील ‘झेप’ या पुनर्वसन केंद्रामध्ये.