esakal | शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा , विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा..!
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा , विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - केंद्र सरकार (Central Government) राज्यांना लशींचा पुरवठा (Vaccine Supply) करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण (Vaccination) सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे. परिणामी, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लशींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे (Student) महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे. लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या दीड वर्षांपासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलली आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचे नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे राज्यातील त्या त्या भागातील सर्व पदाधिकारी आपल्याला भागात लोकशाही मार्गाने विविध स्वरूपात आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा: Pimpri : अकरावीसाठी कॉलेज कोटा ‘मॅनेज’

मोदीजी शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा , विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा..! मोदीजी भाषणांचे वशीकरण थांबवा , विद्यार्थ्यांचे लसीकरण राबवा...!मोदी सरकार आतातरी विचार करा थोडा, विद्यार्थ्यांच्या भविष्यात नका घालू खोडा...! अशा विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या मुद्यांकडे वेधले जाणार आहे.’

loading image
go to top