
पिंपरी : महापालिका शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमाच्या सहा अनधिकत शाळांची यादी प्रसिद्ध केली. त्याला दोन महिने उलटले. पण, आतापर्यंत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी अनधिकृत ठरवलेल्या १३ पैकी सात शाळांची नावे यावर्षी गायब करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच आहेत. विशेष म्हणजे ‘अनधिकृत शाळा’ असे फ्लेक्स मोजक्याच शाळांसमोर लावल्याचे दिसून आले आहे.