डॉक्टरनं भीती दाखवल्यामुळं भोसरीत घडला 'हा' धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

थंडी, ताप, खोकला येत असल्याने दवाखान्यात गेलेल्या वृद्धाला डॉक्‍टरने भीती दाखविल्याने वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे उघडकीस आली.

पिंपरी : थंडी, ताप, खोकला येत असल्याने दवाखान्यात गेलेल्या वृद्धाला डॉक्‍टरने भीती दाखविल्याने वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे उघडकीस आली. 'डॉक्‍टरने भीती दाखविल्याने मी आत्महत्या करीत आहे', अशी चिठ्ठी लिहून वृद्धाने गळफास घेतला. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' राजकीय पदाधिकाऱ्यांना घ्यावा लागतोय दैवतांचा 'आधार' ?

शिवाजी मारुती होळकर (वय 68, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. होळकर यांनी शुक्रवारी (ता. 11) पहाटे राहत्या घरात पंख्याच्या हुकाला गळफास घेतला. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

चिंचवडमधील रस्त्यांवरून शिवसेना अन् भाजपमध्ये राजकारण पेटलंय

दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर होळकर यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली. 'थंडी, ताप, खोकला येत असल्याने जवळच्या खासगी दवाखान्यात गेलो होतो, तेथे डॉक्‍टरने भीती घातली. मी आत्महत्या करीत आहे, माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये', असे चिठ्ठीत नमूद केले आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elder man commits suicide due to doctor's fear at bhosari