वाकडकरांचा सुटीचा दिवस गेला विजेविना; सकाळपासून वीजपुरवठा खंडित 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

वाकड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्याकरिता आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महावितरणने सकाळपासून वीजपुरवठा खंडित केला आहे.

पिंपरी : वाकड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्याकरिता आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महावितरणने सकाळपासून वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत महावितरणे नागरिकांना कळविले होते. परंतु, रविवार सुटीचा दिवस असल्याने पूर्ण दिवस रहिवाशांना अंधारात घालवावा लागला. 

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजकीय 'बॉम्ब'

वाकड, विशाल नगर, कस्पटेवस्ती, पिंपळे निलख आदी परिसरातील वीज वाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित होत होता. उच्च्रभू सदनिकाधारकांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे शनिवारी (ता. 26) महावितरण अधिकारी, कर्मचारी व सदनिकाधारक, लोकप्रतिनिधी यांनी बैठक घेतली. महावितरणने आज (ता.27) दुरुस्तीचे काम घेतले होते. त्याअंतर्गत वाकड गावठाणातील महापालिकेच्या प्राथमिक शाळेजवळील रस्त्याच्या मधोमध असलेला तसेच, नागरिकांना अडथळा ठरणारा ट्रान्सफॉर्मर व इडन टॉवर फिडर हटविण्यात आला. त्याचे दुसऱ्या जागेवर स्थलांतर केले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 22 मृत्यूंची नोंद 

महावितरणने दुरुस्तीचे काम सुरू केल्यामुळे सकाळी साडेदहा वाजल्यापासून वीज गायब झाली. त्याचा परिणाम ग्रीन स्पेस, रोहन तरंग, माउंटवर्ट वन, अजिंक्‍य हॉटेल, साई इरॉला, रिव्हर रोड परिसरातील ग्राहकांवर झाला. मात्र, महावितरण अगोदरच कळविल्यामुळे नागरिकांनी तक्रार केली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity disconnect in wakad since morning