पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी मास्कच्या आत बसवले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस | Police Recruitment Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electronic Device in Mask
पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी मास्कच्या आत बसवले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस

पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी मास्कच्या आत बसवले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शुक्रवारी झालेल्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेत एकाने कॉपी करण्यासाठी चक्क मास्कच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवले. मात्र, तपासणी हा भामटा पोलिसांच्या हाती लागला. हा प्रकार हिंजवडीतील परीक्षा केंद्रावर घडला.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस शिपाई पदासाठी शुक्रवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. सहा जिल्ह्यातील ४४४ केंद्रावर घेतलेल्या या परीक्षेसाठी एक लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांचे अर्ज आले होते.

हेही वाचा: सिग्नल नसल्याने रावेत चौकात धोका

दरम्यान, हिंजवडी येथील ब्लू रिज शाळेत केंद्रात एकाने कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला. एका परिक्षार्थीने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅटरी, मोबाईल सिम कार्ड बसवले होते. त्याची तपासणी केली असता मास्कमध्ये या वस्तू आढळल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

loading image
go to top