Pune Traffic: वाकड, पुनावळे, किवळे कोंडी सुटणार; ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ उभारणार, सेवारस्त्यांच्या १२ मीटर रुंदीकरणाला मुहूर्त
Pune News: किवळे ते बालेवाडी स्टेडियमदरम्यान ८.६ किमी उन्नत मार्ग आणि सेवारस्त्यांचे १२ मीटर रुंदीकरण होणार आहे. यामुळे वाकड, पुनावळे, किवळे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) किवळे मुकाई चौक, पुनावळे, ताथवडे, वाकड येथील भूमकर व भुजबळ चौकातील वाहतूक कोंडी लवकरच सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.