esakal | अकरावीचे वर्ग भरले...विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले | Student
sakal

बोलून बातमी शोधा

College Start
अकरावीचे वर्ग भरले...विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले

अकरावीचे वर्ग भरले...विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला तोंड देत अखेर कनिष्ठ महाविद्यालय परिसर पुन्हा गजबजू लागला आहे. आता पहिल्या फेरीत प्रवेशित झालेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्यास हळूहळू सुरवात झाली आहे. परिणामी, शालेय जीवनातून महाविद्यालयीन विश्‍वामध्ये पहिले पाऊल टाकलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले पाहायला मिळाले.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीचे वर्ग सुरू केले. त्यामध्ये श्री म्हाळसाकांत विद्यालय ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी, अमृता विद्यालयम् ज्युनिअर कॉलेज, निगडी, श्री फत्तेचंद विद्यालय ज्युनिअर कॉलेज, चिंचवड , श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल, चिंचवड स्टेशन, प्रतिभा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, चिंचवड, जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पिंपरी, कॅम्प एज्युकेशन व ज्युनिअर कॉलेज, निगडी, सौ. ताराबाई शंकरलाल मुथ्‍था कन्या प्रशाला, अभिषेक ज्युनिअर कॉलेज, शाहूनगर या कॉलेजचा समावेश आहे. मात्र अद्याप काही कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे.

हेही वाचा: पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये उडी मारून एकाची आत्महत्या

मास्कचा वापर, सामाजिक अंतर, थर्मल गनने तपासणी या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयात काही कला, वाणिज्य शाखेचे वर्ग सकाळी साडेसात ते पावणेअकरा, तर विज्ञान शाखेचे वर्ग सकाळी साडेअकरानंतर भरविण्यात आले. कॉलेज जीवनाची सुरवात झाल्याच्या आनंदाने विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले होते. एक दिवसाआड ५० टक्के विद्यार्थिनी संख्या ठेवली आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसलेले होते. अशाप्रकारे कोरोनाच्या नियमांचे पालन करत विद्यार्थी हे कॉलेज कॅम्पसमध्ये फेरफटका मारत होते. त्यामुळे परिसर काहीसा गजबजला होता. काही विद्यार्थी हे प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पूर्तता करत होते.

विद्यार्थिनी म्हणतात,

अकरावीचे ऑफलाइन वर्ग सुरू झाल्याने आम्हाला खूपच फायदा होणार आहे. आणि विशेष म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर आमच्या आई वडिलां प्रमाणेच सर्व शिक्षक आमची काळजी घेतात. पहिल्याच दिवशी आमचे औक्षण करून आम्हाला गुलाबपुष्प देण्यात आले त्यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत.

- नंदिनी संतोष मगर अकरावी कॉमर्स

‘कोविड १९ची तीव्रता कमी झाल्याने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून आमचे अकरावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दिवशी आमचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .विशेष म्हणजे अकरावीचे ऑफलाईन वर्ग सुरू झाल्याने आम्हाला आता प्रत्यक्ष अध्यापनाचा फायदा होणार आहे.’

- प्रियांका सुनील साळवे, अकरावी कॉमर्स

loading image
go to top