esakal | पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये उडी मारून एकाची आत्महत्या | Suicide
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये उडी मारून एकाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये उडी मारून एकाने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (ता. ११) दुपारी घडला. या मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.

पिंपरीतील महापालिका भवनासमोरील सेवा रस्त्यावरून चाळीस वर्षीय व्यक्तीने दुपारी दीडच्या सुमारास ग्रेड सेपरेटरमध्ये उडी मारली. याबाबत तातडीने पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांना कळविण्यात आले.

हेही वाचा: पुणे - नाशिक महामार्गावर नो बॅरिकेड.. नो टोल..

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमीला तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जखमीचा मृत्यू झाला. या घट्नेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

मृत्यू व्यक्ती मनोरुग्ण असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

loading image
go to top