भागिदारीत व्यवसाय करण्याच्या नावाखाली वीस लाखांचा अपहार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

भागिदारीत व्यवसाय करण्याच्या नावाखाली घेतलेले पैसे परत न करता वीस लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पैसे मागितल्यास आत्महत्या करून तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवण्याची धमकीही आरोपीने दिली.

पिंपरी - भागिदारीत व्यवसाय करण्याच्या नावाखाली घेतलेले पैसे परत न करता वीस लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पैसे मागितल्यास आत्महत्या करून तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवण्याची धमकीही आरोपीने दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुष्कर मिश्रा, शिल्पा मिश्रा, सूरज सोमवंशी (तिघेही रा. प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, फेज 2, वाकड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निहारिका मनीष प्रसाद (सेक्‍टर क्रमांक 32, कामोठे, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. भागिदारीमध्ये व्यवसाय सुरू करू असे सांगून आरोपींनी वेळोवेळी फिर्यादीकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात 29 लाख 11 हजार 252 रूपये घेतले. त्यातील अकरा लाख परत केले. त्यानंतर भागिदारी दुकान बंद करू असे फिर्यादीला सांगितले. मात्र, त्यानंतरही दोन्ही दुकाने सुरूच ठेवून व्यवसायामध्ये होत असलेला नफा व फिर्यादीचे उरलेले पैसेही फिर्यादीला परत न करता त्यांचा विश्‍वासघात केला. यासह फिर्यादीचा नऊ महिन्यांचा दोन लाख 70 हजार इतका पगारही दिला नाही. पगाराचे पैसे व उरलेली रक्कम असे एकूण 20 लाख 81 हजार 252 रूपये परत दिले नाही. हे पैसे मागितले असता धमकी दिली.

'ओपन बार'ला महापालिकेची बाकडे; कमिशनरसमोर मांडली नागरिकाने वस्तुस्थिती

तसेच "माझ्यावर डिप्रेशनची ट्रीटमेंट सुरू असून मला पैसे मागू नका, मी आत्महत्या करून तुमचे नावाने चिठ्ठी लिहून ठेवीन, मी यापूर्वी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून माझ्या वडिलांना पाठविली आहे.' अशी धमकी आरोपी शिल्पा मिश्रा हिने फिर्यादीला फोन वरून दिली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

VIDEO - ट्राफीक पोलिसाला बोनेटवरून नेलं आणि म्हणे, माझी चूक काय?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Embezzlement Rs 20 lakh name business partnership crime

Tags
टॉपिकस
Topic Tags: