इंद्रायणी पात्रात जलपर्णीसह कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

घाणेरडे पाणी, अफाट वाढलेली जलपर्णी, घाटावरील पायर्‍यांवर साचलेला कचरा सध्या अशी अवस्था आहे. मोशी येथील पवित्र इंद्रायणी घाटाची.
 

मोशी : घाणेरडे पाणी, अफाट वाढलेली जलपर्णी, घाटावरील पायर्‍यांवर साचलेला कचरा सध्या अशी अवस्था आहे. मोशी येथील पवित्र इंद्रायणी घाटाची.
पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतून तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव व चर्‍होली आदी उपनगरांमधून इंद्रायणी नदी वाहत आहे. एकेकाळी मोशी, चिखली, तळवडे, डुडुळगाव, चर्‍होली येथील नागरिकांची जीवनदायीनी असलेल्या इंद्रायणी नदीत सध्या अस्वच्छता पसरली आहे.

लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून इंद्रायणी घाटाचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने येथील इंद्रायणी पात्रासह या घाटावर अस्वच्छता पसरली आहे.
सध्या पात्रांमध्ये काही प्रमाणावर जलपर्णीची वाढ झाली आहे. पात्रातील पाणी घाणेरडे झाले असून त्याची परिसरात काही प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. घाटाच्या पायर्‍यांवर जलपर्णीसह कचराही साठला आहे. वाढलेल्या या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणावर डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नदीच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांना दुर्गंधीसह डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

 नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या दशक्रिया विधी सभागृहामध्येही अस्वच्छता निर्माण झाली आहे. या सभागृहात कुत्र्यांचा अड्डा जमत असून त्यांनी या ठिकाणी विश्रांतीचे ठिकाण बनविले आहे. गणेशोत्सवात नदी पात्रात गणेशमूर्तीच्या विसर्जनास बंदी असतानाही अनेक नागरिकांनी येथे गणेश विसर्जन केले आहे. त्यातील काही विसर्जित न झालेल्या मूर्ती अद्यापही नदीपात्राच्या वर आलेल्या आहेत. या निर्माण झालेल्या समस्यांबाबत अनेक वेळा नागरिकांनी प्रशासनाला कळवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Empire of waste with water hyacinth in Indrayani character