एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 'हा' नवा आदेश

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. 

पिंपरी : चाकण, तळेगाव परिसरातील कंपन्यांमध्ये जर ठाणे, मुंबई भागातील अधिकारी, कर्मचारी कामासाठी येत असतील किंवा शिरवळमधील कंपन्यामध्ये पुण्यातील कर्मचारी कामासाठी जात असतील तर अशा कंपन्यांना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ने-आण करण्यासाठी स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लगतच्या जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातील मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी कन्टेन्मेंट झोनमधून येत नाहीत, याचा उल्लेख या स्वयंघोषणापत्रात सादर करण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि परिसरातील कंपन्यांमध्ये लगतच्या जिल्ह्यातून कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी कंपनीने राखीव बसची सोय करणे आवश्‍यक आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून ते कंपनीपर्यंतचा प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रवासादरम्यान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृत ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्‍यक आहे. याखेरीज आधारकार्ड, पॅनकार्डची प्रत देखील जवळ बाळगणे बंधनकारक आहे. 

हेही वाचा- Video : आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन होणार मोशीत

दैनंदिन प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांची थर्मलगनद्‌वारे तपासणी करणे, प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर या गोष्टींची सक्‍ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवास करताना बसच्या दर्शनी भागावर स्वयंघोषणापत्राची प्रत लावण्यात यावी. बसमधून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नियमावलीचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करणे देखील आवश्‍यक आहे. कंपन्यांनी स्वयंघोषणापत्र मिळवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, कामगारांची माहिती एक दिवस अगोदर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संबधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे इ- मेल किंवा पत्राद्‌वारे देणे आवश्‍यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा- Video : पिंपरी-चिंचवडकरांनो दातांच्या समस्यांसाठी दंतचिकित्सकांकडे जाणार असाल, तर ही बातमी वाचा​

कंपन्यांकडून सुरक्षेची खबरदारी...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्योगनगरीत कार्यरत असणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक ती खबरदारी घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणे, सॅनिटायझरचा वापर यांचा वापर नियमितपणे होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees are required to submit a self-declaration