कामगारांना आता कंपनीत काम नकोय; कामगार शोधण्यासाठी उद्योजकांकडून सोशल मीडियाचा वापर

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

काही आयटीआय झालेले कुशल कामगारांना आता मॉलमधील वातानुकूलित नोकरी खुणावू लागली आहे.

पिंपरी : काही आयटीआय झालेले कुशल कामगारांना आता मॉलमधील वातानुकूलित नोकरी खुणावू लागली आहे. त्यामुळे कुशल कामगार मिळविण्यासाठी उद्योजक व्हॉटसऍपसारख्या सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. यामध्ये काही उद्योजकीय संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून कंपन्या सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यांना कुशल कामगार अपेक्षित संख्येने मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे केवळ छोटे उद्योजकच नव्हे, तर मोठ्या कंपन्याही त्रस्त झाल्या आहेत. आधीच कोरोनामुळे अनेक कामगार परप्रांतात निघून गेले. जे आहेत त्यांच्यातील अनेकजण मॉलसारख्या ठिकाणी काम करत आहेत. शहरात नामांकित ब्रॅण्डचे अनेक मॉल येत आहेत. काही अगोदरच सुरु आहेत. त्यांनाही दहावी, बारावीपर्यंत शिक्षण झालेले तरुण-तरुणी हवे असतात. तेथे कोणतेही जड ओझे उचलायचे काम नसते. तसेच सोपे काम असते. त्यामुळे कमी शिक्षण झालेले तरुण येथे काम करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे कामगार मिळविण्यासाठी कंपन्यांच्या अक्षरक्ष: नाकीनऊ येऊ लागले आहेत. 

हेही वाचा- Video : आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन होणार मोशीत

उद्योजक त्यांच्या मोबाईलमध्ये जेवढे व्हॉटसऍप ग्रुप असतील, त्या सर्व ग्रुपमध्ये त्यांना हव्या असलेल्या मनुष्यबळाची मागणी नोंदवितात. ही माहिती संबंधित ग्रुपमध्ये पाठविल्यानंतर त्या-त्या ग्रुप ऍडमिन, सदस्यांना त्यांच्या अन्य ग्रुपमध्ये पाठविण्याची विनंतीही करीत आहेत. उदा. गुजरातमधील बडोद्याजवळील एका मोठ्या कंपनीला 100 शिकाऊ पदवी किंवा पदविकाधारक अभियंते हवे आहेत. तेथे अभियंत्यांची राहण्याची सोयही संबंधित कंपनी करणार आहे. त्यासाठी व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी सगळीकडे संदेश पाठवायला सुरवात केली आहे. 

हेही वाचा- Video : पिंपरी-चिंचवडकरांनो दातांच्या समस्यांसाठी दंतचिकित्सकांकडे जाणार असाल, तर ही बातमी वाचा​

शहरातील काही मॉलमध्ये काम करीत असलेले काही तरुण डिझेल मेकॅनिक, टर्नर असे आयटीआयचे (औद्योगिक तंत्रशिक्षण संस्था) अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. मात्र त्यांना कंपनीत काम करण्यापेक्षा मॉलमध्ये वस्तू जागच्याजागी ठेवण्याचे तुलनेने सोपे आणि कमी कष्टाचे काम करण्यात रस असल्याचे जाणवले. त्यामुळे उद्योजक आता व्हॉटसऍप सारख्या सोशल मिडियाचा आधार घेऊ लागले आहेत. 

- राहुल खोले, सचिव, लघुउद्योग भारती संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entrepreneurs use social media to find workers