'मुख्यमंत्रीसाहेब, 'त्या' कुटुंबांना महिना दहा हजार मदत द्या'; कोणी केलीय ही मागणी?

CM_Uddhav_Thackeray
CM_Uddhav_Thackeray

पिंपरी : लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद असल्याने गुरव समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला दहा हजार रुपये द्यावेत, विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक शुल्क माफ करावे, मंदिर स्वच्छतेसाठी पाच हजार रुपये द्यावेत, असे साकडे राष्ट्रीय गुरव समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे. 

यासंदर्भात प्रताप गुरव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तहसिलदार गीता गायकवाड यांना निवेदनही दिले. या वेळी पिंपरी-चिंचवड गुरव समाज संस्थेचे अध्यक्ष श्रीहरी गुरव, कार्याध्यक्ष पार्थ गुरव, सरचिटणीस भारत भोसले, उपाध्यक्ष नितीन गुरव आणि बाराबलुतेदार प्रदेश युवाध्यक्ष विशाल जाधव उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, "राज्यातील सर्व प्रमुख मंदिरे आणि ग्रामदेवतांची मंदिरे बंद आहेत. या मंदिरांची पूजाअर्चा, साफसफाई, दिवाबत्ती करुन भाविकांकडून मिळणाऱ्या दक्षिणेतून आणि गावातून मिळणाऱ्या शिधेद्वारे गुरव समाजाचा उदरनिर्वाह चालतो.

मागील तीन महिन्यांपासून याद्वारे मिळणारे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे गुरव समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरु झाल्यामुळे विशेष बाब म्हणून देवस्थान इनाम जमिनीवर एकरी 20 हजार रुपये विनाअट पीककर्ज मिळावे.'' जमावबंदीचे कलम लागू असल्याने आंदोलन न करता समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिल्याचे प्रताप गुरव यांनी सांगितले. 

आकडे बोलतात...
- राज्यातील गुरव समाजाची लोकसंख्या - 35 लाखाहून अधिक 
- महाराष्ट्रातील मंदिरांची अंदाजे संख्या - 41,000 
- देवस्थान इनाम जमीन असलेली मंदिरे - 18387 
- ग्रामदेवतेच्या मंदिरांची संख्या - 22623

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com