शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सव्वा लाख शेतकऱ्यांचे पीक कर्ज झाले माफ!

Farmer
Farmer

पुणे : राज्य सरकारने २०१९ च्या अखेरीस जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बुधवार (ता.२४) अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४४९ शेतकऱ्यांचे ८२७ कोटी ५४ लाख रुपयांचे पीक कर्ज माफ झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

दरम्यान, हे पीक कर्ज माफ झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ७६ हजार १३८ शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) ५३३ कोटी सहा लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

राज्य सरकारने पीक कर्जमाफी योजनेला महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ असे नाव दिले आहे. या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार ७८५ शेतकऱ्यांचे कर्ज खाते सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत. यापैकी १ लाख २५ हजार ९२० खाते आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहेत. यापैकी १ लाख २१ हजार ७७६ कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण बॅंकेच्यावतीने पुर्ण करण्यात आले आहे.

कर्जमाफ झाल्यानंतर पुन्हा यंदा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण सुमारे ६५ टक्के एवढे आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण राज्यात सर्वाधिक ठरले असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

पुणे जिल्हा बँकेला खरिपातील पिकांसाठी १ हजार ६५३ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी आज अखेरपर्यंत १ हजार ५३ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ६३.७० टक्के इतके असल्याचेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

खरिपात सव्वा लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज

पुणे जिल्हा बँकेने गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण २ लाख १९ हजार ३६४ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले होते. वाटपाचे हे प्रमाण जिल्ह्यातील सर्व बँकाचे मिळून १०० टक्क्यांपैकी एकट्या पुणे जिल्हा बँकेचे ८०.८० टक्के इतके होते, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात एकूण २ लाख ७१ हजार ३७० इतके पीक कर्ज घेणारे शेतकरी आहेत. यापैकी २ लाख १९ हजार ३६४ शेतकऱ्यांना एकट्या जिल्हा बँकेच्यावतीने पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार परतफेडीस मुदतवाढ आणि व्याज सवलत आदी लाभ देण्यात आले आहेत.
- प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक, पुणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com