esakal | ‘एमएचटी-सीईटी’ साठी परीक्षा केंद्र परजिल्ह्यात आल्याने परीक्षा केंद्रांचा उडाला गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

student exam

‘एमएचटी-सीईटी’ साठी परीक्षा केंद्र परजिल्ह्यात आल्याने परीक्षा केंद्रांचा उडाला गोंधळ

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी पदवी अभ्याक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’ साठी परीक्षा केंद्र परजिल्ह्यात दिले आहेत. परिणामी सोलापूर मधल्या काही विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवडमध्ये परीक्षा केंद्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर प्रमाणेच परभणी, सांगली, नागपूर यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये या परीक्षा केंद्रांचा गोंधळ उडाला आहे. ‘एमएचटी-सीईटी’सेलकडे सर्व विद्यार्थी आपल्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे परीक्षा केंद्र देण्याची मागणी करत आहेत.

राज्य सीईटी सेलमार्फत कोरोनामुळे सुमारे दोन महिने उशिराने ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर सध्या घेतली जात आहे. सीईटीसाठी सुमारे राज्यभरातून ५ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. येत्या १ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, सर्व विद्यार्थ्यांना सीईटीसाठी जवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. त्यानुसार यंदा १९८ परीक्षा केंद्राएवजी २२६ केंद्रावर परीक्षा होत आहे. परंतू प्रत्यक्षात परीक्षेसाठी हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर सोलापूर मधील काही विद्यार्थ्यांना सोलापूराएवजी पिंपरी चिंचवडतील परीक्षा केंद्र मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करावा लागणार असल्याने पालकांची चिंता वाढली असल्याचे आदित्य करकले या विद्यार्थ्याने सांगितले.

हेही वाचा: नागपूर मेट्रोमध्ये बंपर भर्ती, महिन्याला मिळेल २ लाख पगार

कोरोनाचा काळ पाहता तसेच सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नसताना, इतक्या लांबचा प्रवास विद्यार्थ्यांच्या आरोग्यास बाधक ठरण्याची शक्यता असे विद्यार्थी अजय मोरे यांनी व्यक्त केली. आर्थिक गरजू विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करणे शक्य होणार नाही, या सर्व परिस्थितीचा विचार करता ‘एमएचटी सीईटी’ सेलने सर्व विद्यार्थ्यांना आपल्या तालुक्याचे अथवा जिल्ह्याचे परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी प्रज्वल खुटाळ या विद्यार्थ्याने केली आहे. केंद्र संख्या कमी असल्यास वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घ्यावी, असे विद्यार्थी अनुराग पाटील यांनी सांगितले.

‘केंद्र संख्या कमी असल्यास वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घ्यावी. सेलने सर्व विद्यार्थ्यांना आपल्या तालुक्याचे/ जिल्ह्याचे परीक्षा केंद्र द्यावे. या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शैक्षणिक हिताचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने घ्यावा.’

- अनिश काळभोर, संयोजक, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटना

loading image
go to top