esakal | खोदकामामुळे सांगवीत गॅसगळती; तात्काळ दुरूस्ती
sakal

बोलून बातमी शोधा

खोदकामामुळे सांगवीत गॅसगळती; तात्काळ दुरूस्ती

खोदकामामुळे सांगवीत गॅसगळती; तात्काळ दुरूस्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : नवी सांगवी भागातील कृष्णाचौक ते काटे चौक या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते खोदकामात जेसीबीच्या धक्क्याने एमएनजिएल गॅस पाईपलाईन वाहिनी जॉईंट निसटून गॅस गळती झाली.

मात्र, वेळीच खबरदारी घेत संबंधित स्मार्टसिटी विभागाकडून अग्निशामकदल व एमएनजीएला कळविण्यात आले. येथील खोदकामाचा राडारोडा जेसीबीच्या साहाय्याने भरताना त्यातील एक दगड निसटून पाईपलाइनच्या जॉईंटवर पडल्याने लिकेज झाले होते. तात्काळ दुरूस्ती करण्याचे काम रात्री आठ पर्यंत सुरू होते. तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे स्मार्ट सिटी अभियंता विजय बांदल यांनी सांगितले.

loading image
go to top