esakal | महापालिका आयुक्तांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook Fraud

महापालिका आयुक्तांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी - चिंचवड महापालिका (PCMC) आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil) यांच्या नावाने फेसबुकवर (Facebook) बनावट अकाऊंट (Fake Account) तयार करून लोकांकडून पैसे (Money) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Fake Account on Facebook in the Name of Municipal Commissioner)

महापालिकेचे माहिती - तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण यांनी यांसदर्भात पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करीत पैशांची गरज असल्याचे मॅसेज पाठवून अनेकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये पिंपरी - चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेही असेच बनावट फेसबुक अकाऊंट बनवून यूजर्सकडे पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता. आता महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून लोकांकडून पैसे मागितले आहेत. याशिवाय या अकाऊंटवरून काही जणांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली आहे. मात्र, त्यानंतर हे अकाऊंट बंद केले आहे.

''महापालिका आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्यानंतर हे अकाऊंट बंद करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार प्राप्त झाली असून फेसबुककडून माहिती मागविण्यात येणार आहे.''

- सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड.

loading image
go to top