esakal | Pimpri : गोळीबार झाल्याचा पोलिसांना खोटा कॉल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pimpri : गोळीबार झाल्याचा पोलिसांना खोटा कॉल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भांडण झालेल्या व्यक्तीला त्रास व्हावा, यासाठी एकाने पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करून आपल्यावर भांडण झालेल्या व्यक्तीने गोळीबार केल्याची खोटी माहिती पोलिस नियंत्रण कक्षास दिली. हा प्रकार बुधवारी (ता.२९) दुपारी

हेही वाचा: शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

सव्वाएकच्या सुमारास कासारवाडी येथे घडला. खोटा कॉल केल्याप्रकरणी तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सनी उर्फ निखिल रामदास भोसले (वय २५, रा. गुरूनानक कॉलनी, रेल्वे गेटजवळ, कासारवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरूणाचे नाव आहे.

सनी याने पोलिस नियंत्रण कक्षास फोन केला व त्यावर मुमताज मन्सूरी यांचे नातेवाईक तुषार मन्सूरी व एजाज मन्सूरी यांनी पिस्तुलमधून गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा: IPL 2021 : मॅक्सवेलची फिफ्टी, RCB प्ले ऑफपासून एक पाउल दूर

पोलिसांनी सनी, तुषार, एजाज या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता मंगळवारी (ता. २८) सनी याचे मुमताज मन्सूरी यांच्याशी भांडण झाले होते. त्यामुळे मुमताज यांना पोलिसांकडून त्रास व्हावा, या हेतूने सनी याने नियंत्रण कक्षास खोटी माहिती दिल्याचे समोर आले. दरम्यान, सनी याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top