ऐन शेती कामाच्या दिवसात बैल गेला; आख्खं कुटुंब सैरभैर झालं, अन् शेवटी...

ऐन शेती कामाच्या दिवसात बैल गेला; आख्खं कुटुंब सैरभैर झालं, अन् शेवटी...

कामशेत : गोठ्यातील बैल मेल्यावर बळीराजाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्याच्या नातवंडांनी, तर हंबरडाच फोडला. घरातील बायकांनी सूतक पाळले. ऐन कामाच्या दिवसात मशागतीला औत जोडायचा कसा, या विवंचनेत सर्व कुटुंबीय होते. बैलच नाही म्हणून घरातील कोणालाच अन्न गोड लागेना. या बाबत 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. अन् या बळीराजाच्या मदतीसाठी एक शेतकरी पुत्रच धावून आला. 

मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कडेपठारावरील कांब्रे पठार येथील रामभाऊ जानकर या शेतकऱ्यांचा बैल रवंथ करता करता गतप्राण झाला. एक वेळी मजुरीने शेतीच्या कामाला मजूर मिळेल, पण औताला बैल आणावा कोठून हा प्रश्न या हंगामात शेतकऱ्यांपुढे असतो. शेतकऱ्याची ही व्यथा 'सकाळ'ने प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत शेतकरी पुत्र असलेले पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी सुमारे एकतीस हजार रुपये किमतीचा बैल स्व-खर्चाने सुनिल दंडेल या शेतकऱ्यांकडून खरेदी करून जानकर यांना दिला. त्यामुळे जानकर यांना अश्रू अनावर झाले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कांब्रे पठार येथील राम शेडगे, ज्ञानेश्वर जानकर, विठ्ठल जानकर, भाऊ आखाडे यांच्यासह वडगाव येथील सुनील दंडेल, विशाल वहिले, गणेश ढोरे, सोन्या चव्हाण, भाऊसाहेब ढोरे, सुहास वायकर, अक्षय रौंधळ उपस्थित जानकर यांना हा वृषभराज देण्यात आला. रामभाऊ जानकर म्हणाले, "दोन दिवस बैल मिळावा म्हणून फिरत होतो. सभापती वायकर यांनी केलेल्या मदतीने औताची काळजी मिटली. 'सकाळ'ने हा प्रश्न मांडला सकाळ माध्यम समूहाचे आभार." 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बाबूराव वायकर म्हणाले, "सह्याद्रीच्या पठारावर निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामुळे जनावरे मरत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. जनावरांना सकस आहाराची गरज आहे, यासाठी मुरघास हा चांगला पर्याय आहे. पठारावर लसीकरणाच्या सूचना दिल्या आहेत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com