Dehu News : आठव्या मजल्यावरून पडून देहूत बाप-लेकीचा मृत्यू

इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डकमधून पडून अडीच वर्षांच्या मुलीसह वडिलांचा मृत्यू झाला.
Shreya and Ramesh
Shreya and RameshSakal

देहू - इंद्रायणी नदीलगतच्या इंद्रायणी वाटिका इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डकमधून पडून अडीच वर्षांच्या मुलीसह वडिलांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

रमेश मारुती लगड (वय ३४, रा. इंद्रायणी वाटिका, देहू, मूळगाव पिंपळसुटी, ता. शिरूर, पुणे) आणि मुलगी श्रेया (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लगड कुटुंबीय दीड वर्षापासून इंद्रायणी वाटिका इमारतीत राहण्यास आहे. त्यांची स्वतःची सदनिका होती. रमेश, त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघे राहत होते.

लष्कराच्या सेंट्रल ऑर्डनन्स डेपोत (सीओडी) रमेश नोकरीला होते. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास इमारतीखाली मुलीसोबत ते खेळत होते. त्यांनतर घरी आठव्या मजल्यावर गेले. मात्र, साडेबाराच्या सुमारास डकमधून रमेश व मुलगी खाली पडले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला धक्का सहन न झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com