
वाकडला शीख समाज बांधवांकडून छबीलचे आयोजन
वाकड : शीख धर्मीयांचे पाचवे धर्मगुरू, गुरू अर्जुन देवजी यांच्या शहीदी गुरु पर्वानिमित्त वाकड येथे छबीलचे (थंड शरबत आणि स्नॅक्स वाटप) आयोजन करण्यात आले होते. शीख समाज बांधवांनी वाटसरू, वाहनचालक, रस्त्याने येजा करणारे रहिवाशी अशा सुमारे दोन हजार नागरिकांना शरबत आणि स्नॅक्स वाटपाची सेवा केली. टू मिल्स एक्स्ट्रा आणि साघसंगत यांच्या वतीने ही सेवा करण्यात आली. गुरू अर्जुन देवजी सिखांचे पाचवे धर्मगुरू होते. मुघलांनी त्यांना पेटत्या चुलीवरील तप्त तव्यावर बसविल्याने ते शहिद झाले होते.

ते शाहिद झाल्याच्या निमित्त शीख समाज बांधव दरवर्षी कडक उन्हाळ्यात समाज बांधवांना मधुर आणि थंड शरबत वाटून थोडा माणुसकीचा थंडावा आणि शितलता वाटली जाते त्यास छबील अचे म्हणतात. सिख समाजातील आयटी प्रोफेशनल तरुण-तरुणींकडून दरवर्षी वाकड आणि हिंजवडी परिसरात छबीलचे आयोजण केले जाते तसेच टू मिल्स एक्स्ट्रा हा एक उपक्रम राबविला जातो ज्यात कुठल्याही देणगीच्या मदतीविना गरजू लोकांना जेवण पुरविले जाते.
Web Title: Fifth Guru Of Sikhs Guru Arjun Devji Martyrdom Distribution Of Soft Drinks And Snacks Wakad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..