esakal | पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पन्नास टक्के ब्युटी पार्लर झाली बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty-Parlour

इतरांच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायातलं तेजच निघून गेलं आहे. भाडे व वीजबील भरण्याची ऐपत नसल्याने शहरातील तब्बल पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांनी ब्युटी पार्लर बंद केले आहेत. उरलेल्या महिला व्यावसायिकांनी स्वत:च्या पार्लरमध्ये किंवा घरपोच पार्लर ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे. आठ महिन्यापूर्वीपर्यंत आर्थिक बाजुने सक्षम होत निघालेल्या या महिलांची आता आर्थिक कोंडी झाली आहे. आता सगळी अर्थव्यवस्थाच मंदावल्याने पर्यायी मार्ग शोधणेही त्यांना अवघड झाले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पन्नास टक्के ब्युटी पार्लर झाली बंद

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी - इतरांच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलविणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायातलं तेजच निघून गेलं आहे. भाडे व वीजबील भरण्याची ऐपत नसल्याने शहरातील तब्बल पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांनी ब्युटी पार्लर बंद केले आहेत. उरलेल्या महिला व्यावसायिकांनी स्वत:च्या पार्लरमध्ये किंवा घरपोच पार्लर ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे. आठ महिन्यापूर्वीपर्यंत आर्थिक बाजुने सक्षम होत निघालेल्या या महिलांची आता आर्थिक कोंडी झाली आहे. आता सगळी अर्थव्यवस्थाच मंदावल्याने पर्यायी मार्ग शोधणेही त्यांना अवघड झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे व पिंपरी-चिंचवड तब्बल पाच हजारांहून अधिक ब्युटी पार्लर आहेत. स्पा, मसाज बरोबरच ए-वन ट्रिटमेंट देणारे हाय-फाय पार्लर आहेत. आकर्षक ग्लासकाम असलेले हे पार्लर महिलांना मोहून टाकत असे. काहीशी विश्रांती व गप्पा-टप्पाही या माध्यमातून होत. महिलांच्या गाठीभेटी होऊन विरंगुळाही होत असे. चेहरा, केस किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही तक्रार असली तरीही पार्लर म्हणजे सोल्युशन वाटत असे. यापलीकडे पार्लर व्यावसायिकांचे भिशी बरोबरच छोटे-मोठे व्यवसायही यासोबत सुरु होते. मात्र, या सर्व ऍक्‍टिव्हिटीही एकदमच ठप्प झाल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

छोट्या-मोठ्या पार्लरचे भाडे किमान वीस हजार ते एक लाखांच्या घरात आहे. मॉलच्या ठिकाणी सर्वाधिक युनिसेक्‍स पार्लर आहेत. या चकचकीत दुकानांचे भाडे लाखाच्या घरात आहे. शहरातील नामांकित युनिसेक्‍स ब्युटी पार्लरने विविध प्रकारच्या ऑनलाइन सूट देऊनही बुकींग होत नाही. दिवाळी व लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे, तरीही प्रतिसाद अत्यल्प आहे.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये 113 नवीन रुग्ण

पार्लरचे पूर्ण काम हे त्वचेशी संबंधित असल्याने अद्यापपर्यंत महिलावर्ग संसर्गामुळे घाबरत आहे. उरलेल्या महिला व्यावसायिक लग्नसराई व दिवाळीची आस लावून बसल्या आहेत. सध्या हेअर कटिंग व आयब्रो केले जात आहेत. याशिवाय चेहऱ्याशी संबंधित फेशिअल, स्पा, वॅक्‍स या सेवा घेण्यास कोणीही धजावत नाही. बऱ्याच ट्रेनी महिला व्यावसायिक या क्षेत्रात आहेत. ज्यांनी मोठ्या हिरीरीने पार्लरमधून प्रशिक्षण पूर्ण केले. अशा ज्युनिअर महिला चालकांच्या हाताला सध्या कामच उरलेले नाही. त्यांना थेट पार्लर व्यवसायातून रजा घेण्याची वेळ आली आहे. आठ ते दहा हजार रुपयांवर या महिला पार्लरमध्ये काम करत असत.

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडूनही उमेदवार रिंगणात 

काय आहे नेमका खर्च?

 • डिस्पोजल वस्तू
 • साहित्य निर्जुंतकीकरण करणे
 • मनुष्यबळाचा पगार
 • वीजबिल व भाडे
 • महागड्या क्रिमस व साहित्य
 • अत्याधुनिक पार्लर मशीन
 • फर्निचर सेटअप

काय करतायेत या महिला व्यावसायिक

 • चपाती केंद्र चालविणे
 • खाणावळ व्यवसाय
 • भाजी व्यवसाय
 • सिझनेबल बिझनेस
 • दिवाळीत आकाशकंदिल व पणत्यांची ऑर्डर

बऱ्याच महिलांनी पार्लर बंद केले. भाडे परवडत नाही. काही विधवा व सिंगल वूमनचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. लॉकडाउनपासून अद्यापही महिलांचा व्यवसाय रुळावर आलेला नाही. भाडेही माफ केले नाही. सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
- चंद्रशेखर जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे-पिंपरी-चिंचवड

Edited By - Prashant Patil