दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये 50 हजारांवर रुग्ण झालेत बरे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असली, तरी त्यावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असली, तरी त्यावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णसंख्येने रविवारी (ता. 13) 50 हजारांचा आकडा पार केला. तसेच, शहराबाहेरील पुणे व जिल्ह्यातील रुग्णही शहरात उपचार घेत आहेत. त्यांतील तीन हजार 91 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 53 हजारांवर गेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत एक हजार 28 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 63 हजार 622 झाली. आज शहरातील एक हजार 299 आणि शहराबाहेरील रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शहरातील बरे झालेल्यांची संख्या 50 हजार 41 झाली. आजपर्यंत शहराबाहेरील तीन हजार 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 30 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील 13 व शहराबाहेरील 17 जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृत्यू संख्या एक हजार 39 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 291 झाली आहे. सध्या नऊ हजार 451 रुग्ण सक्रिय आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची रेबीज लशीसाठी धावपळ 

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

आज मृत झालेल्या व्यक्ती चिखली (पुरुष वय 65 व 35), आकुर्डी (पुरुष वय 64), भोसरी (पुरुष वय 66 व 69, स्त्री वय 54), पिंपळे गुरव (पुरुष वय 69), चिंचवड (पुरुष वय 67), रहाटणी (पुरुष वय 50), निगडी (स्त्री वय 54, पुरुष वय 69), दिघी (पुरुष वय 57), आंबेगाव (पुरुष वय 70, 54 व 68), सातारा (पुरुष वय 66 व 47), पुणे (पुरुष वय 45 व 47, स्त्री वय 65), खेड (पुरुष वय 70 व 69), जुन्नर (स्त्री वय 68), नगर (पुरुष वय 81 व स्त्री वय 60), मावळ (पुरुष वय 65), वाघोली (पुरुष वय 75), धनकवडी (पुरुष वय 58), कौसे (पुरुष वय 35) आणि रावेत (स्त्री वय 82) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty thousands over patients corona free in pimpri chinchwad