बनावट प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरीचा लाभ घेणाऱ्या बोगस खेळाडूंवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

राष्ट्रीय स्तरावर सेपक टकरा हा खेळ खेळल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासकीय नोकरी प्राप्त केली.

पिंपरी : राष्ट्रीय स्तरावर सेपक टकरा हा खेळ खेळल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासकीय नोकरी प्राप्त केली. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनच्या सचिवासह बोगस खेळाडू व अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी घडली. 

हेही वाचा- भाऊ गृहमंत्री असताना साइड ब्रॅंचमध्ये केलं काम; सहाय्यक पोलिस आयुक्तांचं अजित पवारांकडून कौतुक  

याप्रकरणी सुहास महादेव पाटील (वय 48) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, ते महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा व युवक संचनालयात सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनचे सचिव डॉ. सुखदेव विश्‍वास, कुणाल आहिरे व इतर पदाधिकारी यांच्यासह बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरीचा लाभ घेणारे खेळाडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ही घटना 2009 ते 2018 या कालावधीत घडली. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शासकीय परिपत्रकानुसार, राष्ट्रीय स्तरावर विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूस पाच टक्‍के आरक्षण आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनतर्फे काही जणांना बनावट प्रमाणपत्र दिले. त्या आधारे शासकीय नोकरीतील पाच टक्‍के आरक्षणाचा लाभ घेतला. यामुळे जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत ते वंचित राहिले. आरोपी व बोगस खेळाडूंनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filed a case against players who took advantage of government jobs through fake certificates