Video : फायनान्स कंपन्या, बँकांचा हप्त्यांसाठी महिलांकडे तगादा 

रमेश मोरे
Sunday, 13 September 2020

कोरोनामुळं गृहउद्योगही आर्थिक कोंडीत सापडले आहेत. लघु उद्योगासाठी महिलांनी घेतलेल्या समूह कर्जाच्या हप्त्यांसाठी फायनान्स कंपनी व खासगी बॅंकांनी महिलांकडे तगादा लावला आहे.

जुनी सांगवी : "मी समूह गटातून कर्ज घेतलंय. सध्या कामं बंद आहेत. त्यामुळं हप्ते भरू शकत नाही. मात्र, वसुली प्रतिनिधी दररोज पैशांसाठी तगादा लावताहेत,'' असं पिंपळे गुरव-गांगुर्डेनगरमधील रहिवासी सोनाली कांबळे सांगत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळं गृहउद्योगही आर्थिक कोंडीत सापडले आहेत. लघु उद्योगासाठी महिलांनी घेतलेल्या समूह कर्जाच्या हप्त्यांसाठी फायनान्स कंपनी व खासगी बॅंकांनी महिलांकडे तगादा लावला आहे. येथील नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात वसुली प्रतिनिधी घरी येऊन ठाण मांडत आहेत. पिंपळे गुरवमधील रहिवासी अनिता माने म्हणाल्या, "लॉकडाउननंतर परिस्थितीत बदल होईल, असं वाटलं होतं. मात्र, आता घर चालवणंही कठीण झालंय.'' सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाडूळे म्हणाले, "सध्याची बिकट परिस्थितीत फायनान्स कंपन्यांनी सबुरीने घ्यावं. हप्त्यांसाठी कंपन्यांनी सर्वसामान्य कुटुंबांकडे तगादा लावू नये.'' 

सद्यःस्थिती काय? 
- कर्जाच्या हप्त्यांसाठी महिलांकडे तगादा 
- दीड हजारपासून चार हजारापर्यंतचे हप्ते 
- एक लाखापासून दो लाखांपर्यंतचे कर्ज 
- आठवडे किंवा महिन्याला हप्ते वसुली 

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

थोडे तरी पैसे भरा, असं वसुली प्रतिनिधी दररोज फोन करून किंवा प्रत्यक्ष घरी येऊन सांगताहेत. तसंच, घरी ठाण मांडून बसून राहतात. 
- रेश्‍मा सकट, गांगुर्डेनगर, पिंपळे गुरव 

फायनान्स कंपनीच्या वसुलीमुळे अनेक कुटुंबात भांडणं होताहेत. त्यामुळं सरकारने यावर तोडगा काढावा. 
- प्रियंका शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance companies, banks demands for installments to women