esakal | वाकड : फायनान्स कंपनीचे कार्यालय आगीत भस्मसात
sakal

बोलून बातमी शोधा

Finance Company Fire

वाकड : फायनान्स कंपनीचे कार्यालय आगीत भस्मसात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड - फायनान्स कंपनीचे कार्यालय शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (ता ६) सकाळी ९ च्या सुमारास डांगे चौक थेरगाव येथे घडली.

डांगे चौकात बीआरटी रस्त्यालगत छोलामंडल फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. शाखा व्यवस्थापक संजय पवार यांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. या आगीत कार्यालयातील फर्निचर, एसी, कागदपत्रे व इतर कार्यालयीन साहित्य असे एकूण सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे फायनान्स कंपनीकडून अग्निशमन विभागाला सांगण्यात आले आहे.

या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड मोठाले लोळ पसरले होते. शेजारीच असलेल्या बीआरटी पुलावर बघ्यांची आणि फोटो घेण्याऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

loading image
go to top