दापोडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020


दापोडीतील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मटका अड्डा सुरू असल्याची पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला असता आरोपी त्याठिकाणी मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने दापोडी येथे रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत दहा जणांवर गुन्हा दाखल केला. 

मनोज ज्ञानेश्‍वर अडसुळे (वय 52, रा. दापोडी), विजय शिवाजी वायदंडे (वय 65, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव), रफिक मकबुल शेख (वय 61, रा. दापोडी), सागर राजू गायकवाड (वय 25, रा. दापोडी), इब्राहिम उस्मान अत्तार (वय 38, रा. मित्रनगर कॉलनी, फुगेवाडी), नीलेश मोहन गुहागरकर (वय 35, रा. कुंभारवाडा, जुनी सांगवी), सिद्धार्थ दिगंबर कांबळे (वय 41, रा. जय भीमनगर, दापोडी), नितीन मधुकर देवकाते (वय 37, रा. विश्रांतवाडी), अल्ताफ मिंतु शेख (वय 30, रा. दापोडी), मनीष अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

दापोडीतील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मटका अड्डा सुरू असल्याची पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला असता आरोपी त्याठिकाणी मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. या आरोपींवर गुन्हा दाखल करून सात हजार 255 रूपयांची रोकड, 50 हजार 200 रूपये किंमतीचे नऊ मोबाईल व पेन असा एकूण 57 हजार 465 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पुणे-सोलापूर हाय-वेवर धावत्या ट्रॅव्हल्स घेतला पेट; जिवीतहानी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR against ten people in Raid on gambling at Dapodi