पुणे-सोलापूर हाय-वेवर धावत्या ट्रॅव्हल्स घेतला पेट; जिवीतहानी नाही

travels bus caught Fire Pune Solapur highway No casualties
travels bus caught Fire Pune Solapur highway No casualties

लोणी काळभोर (पुणे) - पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत लातूरहून पुण्याकडे जाणाऱ्या स्वाती ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला आज (शनिवारी) सकाळी पावणे आठच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच  लोणी काळभोर पोलिसांच्यासह अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. बसचा टायर फुटल्याने, टायरसह बसलाही आग आगली. बस चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील 29 प्रवाशी मात्र सुखरुप बाहेर पडले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लोणी काळभोर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्हातील मुखेडहून पुण्याला जाण्यासाठी शुक्रवारी (ता. 25) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वाती ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे रवाना झाली होती. यात अकरा महिलांच्यासह 29 प्रवाशी प्रवास करत होते. बस आज (शऩिवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन जवळ बंद पडली. यावेळी बस चालकाच्या छोट्याशा प्रयत्नानंतर बस चालु झाली. ही बस लोणी काळभोरहून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदीराजवळ येताच, बसचा उजव्या बाजुचा मागील टायर फुटला आणि त्याने पेट घेतला. टायरने पेट घेतल्याचे लक्षात येताच बस चालकाने बस रस्त्याच्या एका बाजुला घेऊन बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशी बसमधून खाली उतरत असतानाच, बसनेही मागील बाजुकडुन अचानक पेट घेतला. बसमधील प्रवाशी सुखरूप खाली उतरले असले तरी, प्रवाशांचे खाण्यापिण्याचे साहित्य, प्रवाशी बॅग जळुन खाक झाल्या. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी कोल्हापूरला जाणार!'

दरम्यान. आगीची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांच्यासह वाघोली व हडपसर येथील अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, जिल्हा वाहतुक शाखेचे युराज नांद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन, बसमधील प्रवाशांना धिर देण्याबरोबरच प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com