जखमीचे वाचवले प्राण, पाच लाखांची रोकड सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 January 2021

अपघात झाला की बघ्यांची गर्दी जमते आणि नको ती कटकट चौकशी मागे लागेल, असे म्हणून मदतीसाठी कोण पुढे येत नाहीत. मात्र, एका तरुणाने दाखवलेल्या तत्परतेने जखमी ज्येष्ठ नागरिकाचे प्राणही वाचले आणि जवळची पाच लाखांची रोकडही सुरक्षित राहिली. या प्रामाणिक तरुणाचे नाव आहे शुभम यंदे. तो हिंजवडी राहात असून, आयटी इंजिनिअर आहे.

जुनी सांगवी - अपघात झाला की बघ्यांची गर्दी जमते आणि नको ती कटकट चौकशी मागे लागेल, असे म्हणून मदतीसाठी कोण पुढे येत नाहीत. मात्र, एका तरुणाने दाखवलेल्या तत्परतेने जखमी ज्येष्ठ नागरिकाचे प्राणही वाचले आणि जवळची पाच लाखांची रोकडही सुरक्षित राहिली. या प्रामाणिक तरुणाचे नाव आहे शुभम यंदे. तो हिंजवडी राहात असून, आयटी इंजिनिअर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिक माहिती अशी, की पिंपळे गुरव येथील प्रभुलाल मनानी (वय ६५, रा. पलक रेसिडेन्सी, ओंकार कॉलनी) गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून पुण्याहून पिंपळे गुरवकडे येत होते. औंध येथील राजीव गांधी पूल ओलांडताना वळण मार्गावर मागून येणारे दुचाकी वाहन घासून गेल्याने त्यांची दुचाकी घसरली. ते खाली पडले आणि डोक्‍याला मोठी इजा झाली. बघ्यांची गर्दी जमा झाली. मदतीसाठी कोणच पुढे येईना. दरम्यान, वाहतूक कोंडी झाली. यावेळी पीएमपीएल बसमधून हिंजवडीकडे निघालेला २३ वर्षीय शुभम बसमधून उतरला. तसेच, मनानी यांना तत्काळ रिक्षामधून जवळच असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोबत अपघातस्थळी पडलेली बॅग, पर्स व मोबाईल घेऊन डॉक्‍टरांकडे दिला.

पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

घटनेची माहिती मिळताच सांगवीचे पोलिस उपनिरीक्षक विजय भोंगळे, पोलिस नाईक बापूसाहेब पोटे हे आले. त्यांनी पर्समधील कागदपत्रांवरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून जखमीच्या मुलाला संपर्क साधला. सायंकाळी मुलगा अमित मनानी आल्यावर वडिलांकडील चार लाख ९५ हजार रुपये रोख रक्कम असलेल्या बॅगेसह इतर वस्तू परत दिल्या. गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अजय भोसले, उपनिरीक्षक विजय भोंगळे, बापूसाहेब पोटे यांनी रंगनाथ उंडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगवी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्य बजावले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, की डोक्‍याला इजा झाल्याने त्यांना इथून दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यात आले. मुलगा अमित म्हणाला, की वडिलांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

गर्दी पाहून बसमधून खाली उतरलो. मी माझे कर्तव्य समजून त्या जखमी वडिलधाऱ्यास रुग्णालयात दाखल केले. 
- शुभम यंदे, युवक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh cash saved lives of injured help shubham yande