esakal | कोरोना रुग्णांची बेडसाठी वणवण!  पंचतारांकित रुग्णालयात बेड नाहीत 

बोलून बातमी शोधा

The five-star hospital has no beds for Corona patient


शहरात दररोज अडीज हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढू लागल्यानंतर आता बेड मिळण्यासाठी रुग्णांची धावपळ सुरु झाली आहे. महापालिका रुग्णालये तसेच महापालिकेने निर्माण केलेल्या अद्ययावत जम्बो रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

कोरोना रुग्णांची बेडसाठी वणवण!  पंचतारांकित रुग्णालयात बेड नाहीत 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी ः शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या रुग्णांना बेड मिळणे त्यातही अतिदक्षता विभागात जागा मिळणे हे महादिव्य होऊन बसले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे पंचतारांकित रुग्णालयातच बेड हवा असा अट्टाहास असलेल्या रुग्णांना आज या रुग्णालयात जवळपास बेड उपलब्ध नाहीत. गंभीर बाब म्हणजे शहरातील खासगी रुग्णालयात मिळून आजच्या दिवशी अतिदक्षता विभागात केवळ १७ बेड रिकामे आहेत. 

पुण्याला केंद्राकडून मिळाले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर; अधिकाऱ्याची तक्रार

शहरात दररोज अडीज हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढू लागल्यानंतर आता बेड मिळण्यासाठी रुग्णांची धावपळ सुरु झाली आहे. महापालिका रुग्णालये तसेच महापालिकेने निर्माण केलेल्या अद्ययावत जम्बो रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, कोमॉर्बिड म्हणजे मधुमेह व उच्चरक्तदाबासह विविध आजार असलेल्या पन्नाशीपुढील बहुतेक रुग्ण हे खाजगी पंचतारांकित रुग्णालयात बेड मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आमदारही महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना दूरध्वनी करून वायसीएमबरोबरच नामांकित पंचतारांकित रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी आग्रह करत असतात. कोरोना झालेल्या डायलिसीस व कॅन्सर रुग्णांसाठी या मोठ्या रुग्णालयात आजच्या दिवशी बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध नसल्याचे महापालिकेच्या डॅशबोर्डवर दिसते. पण त्यातही ऑक्सीजन बेड किंवा व्हेंटीलेटर बेड नसल्यातच जमा आहे. हातावर मोजण्याइतपत रुग्णालयांतच ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटरशिवाय बेड उपलब्ध आहेत. 

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

शहरातील ८४ कोरोना रुग्णालयात ३ हजार २५५ बेड असून यातील ७९६ बेड रिकामे आहेत. अतिदक्षता विभागात आज दुपारपर्यंत यातील १७ बेड रिकामे आहेत. यातील बहुतेक बेड हे थेरगाव, काळेवाडी, पिंपळे निलख, चिखली येथील रुग्णालयात शिल्लक आहेत. तथापि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना बेड मिळण्यासाठी यातायात करावी लागेल अशी भीती लोकप्रतिनिधी तसेच काही डॉक्टरांनी व्यक्त केली.