पंढरपुर विठोबाच्या गाभा-यातील सजावटीसाठी मावळातील शेतक-याची फुले

संतोष थिटे
बुधवार, 1 जुलै 2020

आषाढी एकादशीच्या दिवशी केलेल्या फुलांची आकर्षक आरास अधिक प्रसन्न करीत आहे.आषाढी एकादशीच्या निमित्ताने सजवलेल्या लाडक्या विठू रुक्माईचे रूप फुलांच्या सजावटीमुळे अधिकच सुंदर दिसत होते.

बेबडओहोळ : आषाढी एकादशी सोहळ्या निमित्त पंढरपुर येथील विठ्ठलाच्या गाभाऱ्यास तसेच रुख्मिणी मातेच्या मंंदिरात आॅर्किड या विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या सजावटीसाठी आर्किड या विदेशी प्रकारच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. मंदिर गाभाऱ्याशिवाय पायरी, सभामंडप याठिकाणीही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

खबरदार ! सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा...

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी दिवशी यंदा आॅर्किड (विदेशी )फुलांची आरस करण्यासाठी वापर करण्यात आला आहे.यासाठी लागणारी फुले ही मावळ तालुक्यातील धामणे या गावातील युवा शेतकरी रामनाथ दिलीप गराडे यांनी पाठवली आहेत.

आधुनिक तंञज्ञानाच्या जोरावर विदेशी आर्किड फुलांची त्यांनी आपल्या पाॅलीहाॅऊसमध्ये शेती केली.व यातील काही फुले पंढरपुर येथील समितीकडे पाठवण्यात आली होती.हि फुले समितीला पसंद पडल्यानंतर ती सजावटीसाठी पंढरपुरला पाठविण्यात आली. याबाबत बोलताना गराडे म्हणाले,विदेशी फुलांची यशस्वीपणे शेती केल्यानंतर ती पंढरपुरला प्रथमतहा पाठवण्यात आल्याने आमचे भाग्य मोठे आहे. 

कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण

आषाढी एकादशीच्या दिवशी केलेल्या फुलांची आकर्षक आरास अधिक प्रसन्न करीत आहे.आषाढी एकादशीच्या निमित्ताने सजवलेल्या लाडक्या विठू रुक्माईचे रूप फुलांच्या सजावटीमुळे अधिकच सुंदर दिसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers of a farmer from Mavala for decoration in the temple of Pandharpur Vithoba