
माजी उपमहापौर यांचे छायाचित्र असलेले सहा अनधिकृत फलक दहा दिवसांपासून लावलेले आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
पिंपरी - पिंपरीतील मोरवाडी, सम्राट चौकात भाजपच्या एका माजी उपमहापौर यांचे छायाचित्र असलेले सहा अनधिकृत फलक दहा दिवसांपासून लावलेले आहेत. चार दिवसापूर्वी वाढदिवस होवूनही फलक झळकत आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या उपमहापौराचा नऊ जानेवारीला वाढदिवस झाला. यानिमित्त स्थानिक कार्यकर्त्यांकडून चौक- चौकात मोठ मोठे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. काही फलक महावितरणच्या खांबालादेखील लावलेले आहे. दुतर्फा फलक लावल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. मोरवाडी, लालटोपीनगर, टिपू सुल्ताननगर, इंदिरा नगर या परिसरात फलक आहेत. लोकप्रतिनिधींकडूनच शहर विद्रूप होत असल्याने नाराजी आहे.
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु
कारवाईत दुजाभाव
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला परिसरात अनधिकृत फ्लेक्स कोठे लावले आहेत, याबद्दल माहिती असूनही कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे, या मार्गावरील पदपथावर बसून, हातगाडी लावणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर अतिक्रमणाबद्दल कारवाई होते, अशी तक्रार व्यावसायिक करू लागले आहेत.
सीरमनंतर स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता; बैठक सुरु