esakal | माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बोलून बातमी शोधा

Amar-Mulchandani}

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन व माजी नगरसेवक अमर मूलचंदानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, तब्येत बिघाडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

pimpri-chinchwad
माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन व माजी नगरसेवक अमर मूलचंदानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, तब्येत बिघाडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेली माहिती अशी, ''दि सेवा विकास बँकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी तपास केला असता बँकेचे तत्कालीन चेअरमन अमर मूलचंदानी यांचाही यामध्ये सहभाग असल्याने निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना रविवारी (ता. ७) मुंबई येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले.  मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे'.

Edited By - Prashant Patil