माजी नगरसेवक रामदास बोकड यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

जवळकरनगर- पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक रामदास बोकड (वय 60) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. महापालिकेच्या फेब्रुवारी 2012 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 56 (अ) मधून ते निवडून आले होते.

पिंपरी : जवळकरनगर- पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक रामदास बोकड (वय 60) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. महापालिकेच्या फेब्रुवारी 2012 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 56 (अ) मधून ते निवडून आले होते. विशेष म्हणजे त्यांची बिनविरोध निवड झाली होती. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक व अतिशय जवळचे कार्यकर्ते अशी बोकड यांची ओळख होती. महापालिका क्रिडा समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले होते. पिंपळे गुरव येथील सह्याद्री आदिवासी तरुण मंडळाचे काही काळ ते अध्यक्ष होते. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणारा, समाजातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. राजकारणाची कोणतीही ओळख नसताना पहिल्यांदाच ते नगरसेवकपदी निवडून आले होते. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

रामदास बोकड यांना शुक्रवारी रात्री त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. त्यांची कोरोना संसर्ग तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी सांगवी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former corporator Ramdas Bokad passes away