esakal | पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक वसंत वाणी यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant-Wani

पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुंडलिक वाणी (वय 74) यांचे आज रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता.

पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक वसंत वाणी यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - माजी नगरसेवक, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुंडलिक वाणी (वय 74) यांचे आज रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते 1986 मध्ये निवडून आले होते. भाजपचे ते जुने कार्यकर्ते होते. भाजपच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा वैयक्तिक परिचय व संबंध होता. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस व शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. मध्यंतरी काही काळ पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रदेश सरचिटणीस व पुढे प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली. एक उत्तम संघटक अशी त्यांची ख्याती होती. पुढे राष्ट्रवादीच्या ध्येय-धोरणांबाबत मतभेद झाल्यानंतर ते परत भाजपमध्ये परतले. पक्षाने त्यांची प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. पुढे प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते.

पिंपरी-चिंचवडकरांनो, आता घरोघरी राबविली जाणार 'ही' मोहीम

त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ‘सिल्क रुट’ जाहिरात कंपनीचे प्रमुख विवेक वाणी, तसेच टोटल अ‍ॅडव्हर्टायझिंग सोल्युशन्स (टास) या जाहिरात संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व लाडशाखीय वाणी समाज विकास संस्थेचे माजी अध्यक्ष योगेश वाणी यांचे ते वडील होत.

Edited By - Prashant Patil

loading image