पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 43 रुग्ण आढळले; आनंदनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 43 रुग्ण आढळले; आनंदनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या रविवारी (ता. 24) सायंकाळी सहापर्यंत 354 झाली. यात शनिवारी सायंकाळी सातपासून रविवारी सायंकाळी सहापर्यंत 43 रुग्णांची भर पडली. सर्व रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर, शहरातील रहिवासी मात्र पुण्यातील रुग्णालयांत 22 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेली रुग्ण संख्या 374 झाली आहे. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही 170 पर्यंत पोचली आहे. आज केवळ एका जणाला डिस्चार्ज मिळाला आहे. 

शहरात गेल्या 24 तासांत बाधित आढळलेले 43 रुग्ण हे आनंदनगर-चिंचवड, सांगवी, थेरगाव भागातील आहेत. तसेच, देहूरोड, जून्नर आणि आंबेगाव येथील चार रुग्णही आज बाधित आढळले. आज खराळवाडीतील रुग्णाला घरी सोडण्यात आले. सध्या रुग्णालयात 177 जणांवर उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कंटेन्मेंट झोन 

आजपर्यंत शहरात 83 कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. त्यातील 27 भागातील रुग्ण बरे झाल्याने तेथील कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात आले आहेत. सध्या 56 कंटेन्मेंट झोन आहेत. 

आज सील केलेले भाग 

  • वाकड : पंडित शोरूम- ओरिएंटल किचन हॉटेल- डांगे चौक रोड- प्रतिभा मोटर्स परिसर 
  • भोसरी : शास्त्री चौक- बंधन बॅंक- अजय डिस्ट्रिब्युटर्स- हॉटेल शांताई- एचडीएफसी बॅंट एटीएम- श्रेयस मेडिकल परिसर 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सर्वाधिक रुग्ण आनंदनगर 

सर्वाधिक रुग्ण चिंचवड स्टेशन आनंदनगर भागातील आहेत. 13 मे रोजी पहिला रुग्ण आनंदनगरमध्ये आढळला. तेव्हापासून रुग्ण संख्या वाढत आहे. रविवार सायंकाळपर्यंत जवळपास 80 पर्यंत येथील रुग्ण संख्या गेली. आनंदनगरमधील सुमारे पाचशे जणांची मोबाईल लॅबद्वारे शनिवारी तपासणी करण्यात आली. त्यातील 82 संशयितांना वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com