पिंपळे गुरवमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीकडून 45 लाखांची फसवणूक; दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

  • फसवणूकप्रकरणी सांगवी पोलिसांनी भाजप नगरसेविकेच्या पतीला अटक केली आहे. 

पिंपरी : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने 45 लाख रुपये घेत एकाची फसवणूक करण्यात आली. या फसवणूकप्रकरणी सांगवी पोलिसांनी भाजप नगरसेविकेच्या पतीला अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

राजू रामा लोखंडे (वय 50), प्रकाश रामा लोखंडे (वय 48, दोघेही रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. राजू लोखंडे हे माजी नगरसेवक असून, त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत. याप्रकरणी लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय 56, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. राजू याच्यासह त्याच्या भावाने पिंपळे गुरव येथील एक जागा ज्वाईंट व्हेंचरमध्ये भागिदारीने विकसित करू, असे म्हणून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागा खरेदीसाठी पाच लाख, वचनचिठ्ठी करतेवेळी पंधरा लाख आणि समजुतीचा करारनामा करतेवेळी पंधरा लाख रूपये त्यांच्याकडून घेतले. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी, संरक्षण भिंत, पाण्याची टाकी बांधण्यासाठी दहा लाख रूपये खर्च करायला लावला. तरीही आरोपींनी अद्यापपर्यंत जागा विकसित करण्यासाठी दिली नाही किंवा घेतलेले पैसेही फिर्यादीला परत केले नाहीत. दरम्यान, यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. सांगवी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of 45 lakh from BJP corporator's husband in Pimple Gurav