esakal | लोणावळेकरांनो, आता करा मोफत कोरोना तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळेकरांनो, आता करा मोफत कोरोना तपासणी 

१४ ते २१ ऑगस्ट दरम्यान लोणावळ्यातील सर्व भागात जाऊन नागरिकांची तपासणी होणार आहे.

लोणावळेकरांनो, आता करा मोफत कोरोना तपासणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा (पुणे) : मावळचे आमदार सुनील शेळके व क्रस्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत कोरोना प्राथमिक आरोग्य तपासणी आयोजित केली आहे. भांगरवाडी येथून शुक्रवारी (ता. १४) लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, सेवादल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय गवळी आदींच्या उपस्थितीत शिबिरास सुरुवात झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मावळात सध्या कोरोनाचा प्रसार वेगात होत आहे. लोणावळ्यातील रुग्णसंख्याही १४० च्या वर पोचली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली क्रस्नाच्या बसच्या माध्यमातून १४ ते २१ ऑगस्ट दरम्यान लोणावळ्यातील सर्व भागात जाऊन नागरिकांची तपासणी होणार आहे. या तपासणी शिबिरामुळे भविष्यात वाढणारी रुग्णसंख्या व संशयित रुग्णांची माहिती मिळण्यासाठी मोठी मदत होईल, अशी आशा आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी नगरसेवक निखिल कवीश्वर म्हणाले, की आमदार सुनील शेळके यांनी लॉकडाउन काळात शहरासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून, शेळके यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक निखिल कवीश्वर, नगरसेविका संध्या खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब कडू, मनोज लऊळकर, रवी पोटफोडे, सनी पाळेकर, धनंजय काळोखे, संजय भोईर, दिलीप पवार, अजिंक्य कुटे, मधुकर पवार, महेश पवार, डॉ. सीमा शिंदे, अविनाश ढमढेरे, दीपक मालपोटे आदी उपस्थित होते.

loading image