दारू पिताना झाला वाद; मित्रांनीच केला मित्राचा खून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

मित्रांसोबत दारू पीत असताना वाद झाला. त्यातून मित्रांनी डोक्यात बेसिन घालून मित्राचाच खून केल्याची घटना चिंचवड येथे घडली.

पिंपरी : मित्रांसोबत दारू पीत असताना वाद झाला. त्यातून मित्रांनी डोक्यात बेसिन घालून मित्राचाच खून केल्याची घटना चिंचवड येथे घडली.

#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)

शुभम साठे (वय 20, रा. एकता हौसिंग सोसायटी, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकणी कृष्णा भारत कापुरे, अजय मोहन क्षीरसागर आणि ज्ञानेश सुनील थोरात (सर्व रा. समता कॉलनी, थेरगाव) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रविवारी (ता. 30) रात्री शुभम आणि त्याचे मित्र काळेवाडीत एका मंदिराजवळील हॉटेलमागे दारू पीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला अन् तिघांनी शुभमच्या डोक्यात बेसिन घातले. यामध्ये गंभीर जखमी झाल्यानं शुभमचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी (ता. 31) सकाळी उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शुभमचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend's murder by friend in drunken at chinchwad