
पवनानगर : गणेशोत्सव आणि ढोल, लेझीम या पारंपरिक वाद्यांचे अतुट नाते आहे. मावळ तालुक्यातील शेकडो ढोल, लेझीम पथकांचा पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, पिंपरी, चिंचवडसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत नाद निनादत असतो. ढोल-ताशांसह अन्य पारंपरिक वाद्यांना शहरवासीयांना चांगलीच भुरळ घातली आहे.