
पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील पंचवीस विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाण्याची संधी मिळाली. ५० विद्यार्थी हे ‘इस्रो’च्या भेटीसाठी जाणार आहेत. आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) जिल्हा परिषदेला निकाल पाठवला आहे. त्यामध्ये शिरूर आणि खेड तालुक्यातील प्रत्येकी चार विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.