
पिंपरी : गणरायाच्या आगमनाला अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे घरोघरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत सुरू आहे. गणरायाच्या मखराची सजावट, रोषणाई यासोबतच प्राणप्रतिष्ठा आणि त्यानंतरच्या नियमित पूजेसाठी साहित्य खरेदीची लगबग वाढली आहे. पूजा साहित्यामध्ये धूप, अत्तर, गंध, वस्त्र अशा अनेक वस्तूंचा समावेश असतो. या सर्व वस्तू घेणे सोपे जावे, यासाठी पूजा साहित्याचे खास संचही बाजारात आलेले आहेत.