पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)मार्फत विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. .या बस आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या असून गुरूवारपर्यंत (ता. २१) पुणे विभागातील १५० बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यात ५४ नियमित आरक्षित बस आणि ९६ ग्रुप बुकिंग बसचा समावेश आहे. कोकणवासीय काम-व्यवसायासाठी बऱ्याच वेळा इतर शहरात वास्तव्यास आहेत. पण, गणेशोत्सवात ते हमखास गावी जातात. याच चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळातर्फे राज्यभरातून एसटी बसेस सोडल्या जातात. .Ganesh Festival 2025 : ‘रत्नखचित फरा’ अन् ‘रुणझुणती नूपुरे’, गणरायासाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मागणी; सराफा बाजाराला झळाळी.यंदा चिपळूण, दापोली, देवरूख, गुहाघर, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी याठिकाणी जाण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे विभागातील स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आगरातून या विशेष बस सोडण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने यंदा १६१ विशेष एसटी गाड्यांची व्यवस्था केली असून यातील १५० गाड्या आरक्षित झाल्या आहेत. २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने प्रवासी २४ ते २६ ऑगस्टदरम्यान तिकीट आरक्षणाला जादा पसंती दिली आहे..एसटी ग्रुप बुकिंगला उदंड प्रतिसादगणेशोत्सवानिमित्त विशेष बससाठी नागरिकांना ग्रुप बुकिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. ग्रुप बुकिंग केल्यास नागरिकांना घराजवळून ते इच्छितस्थळी जाण्यासाठी विशेष बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या कुटुंबासमवेत किंवा नातेवाईकासमवेत एकत्र प्रवास करता येणार असल्याने नागरिकांनी ग्रुप बुकिंगला उदंड प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली..कधी सुटणार किती एसटी बस ?आगार २४ ऑगस्ट २५ ऑगस्ट २६ ऑगस्ट एकूण स्वारगेट आगार ५ ६५ २८ ९८ वल्लभनगर आगार १४ २८ २१ ६३.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.