Anant Chaturdashi 2020 : जुनी सांगवीत मूर्तीदान करून दिला बाप्पाला निरोप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

जुनी सांगवीसह दापोडी परिसरात भक्तिमय वातावरणात भाविकांनी बाप्पाची मूर्तीदान करून निरोप दिला.

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : जुनी सांगवीसह दापोडी परिसरात भक्तिमय वातावरणात भाविकांनी बाप्पाची मूर्तीदान करून निरोप दिला. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा मिरवणुका व नदी घाटावरील विसर्जनाला बंदी घातली होती. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पहिल्या दिवसापासून खबरदारी घेण्यात येत होती. मात्र, आजही (मंगळवारी) नियम व अटींचे पालन करत काही भाविकांनी घरी, तर काहींनी महापालिकेकडून केलेल्या विसर्जन हौदात मूर्तींचे विसर्जन करून दान करण्यात आल्या. 

पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या 

जुनी सांगवीत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कर संकलन इमारत येथे विसर्जन हौद व संकलनासाठी ट्रॅक्टर, टेंपो, या वाहनांची व्यवस्था केली होती. नागरिक 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत गर्दी न करता लाडक्‍या गणरायाला निरोप देत होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी विसर्जनासाठी संचलन करत होते. हौदात मूर्ती बुडवल्यानंतर त्यांचे संकलन करण्यात येत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh idols immersion in old sangavi anant chaturthi 2020