esakal | पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या 
  • कोरोनामुळे रुग्ण व नातेवाईक त्रस्त
  • वैद्यकीय खर्चात वाढ 

पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या 

sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : ताप आलाय. थंडी वाजतेय. डोके दुखतेय. अंग दुखतेय. सर्दी-खोकला आहे. छातीत कफ वाटतोय. यापैकी काहीही लक्षण आढळले तरी आपण दवाखाना गाठतो. परंतु, कोरोनामुळे डॉक्‍टर काही प्राथमिक स्वरुपाच्या म्हणजेच रक्त, लघवी तपासणी करायचे सांगतात. त्यानुसार आजाराचे निदान झाल्यास ठिक, नाही तर पुढच्या म्हणजे डेंगी, मलेरिया, टायफाइन, चिकुनगुणिया अशा वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागत आहेत. आजाराचे अचूक निदान होईपर्यंत तपासण्यांची मालिका थांबत नाही. रुग्ण व नातेवाईक मात्र वैतागतात. डॉक्‍टरांना दोष देतात. खर्च वाढतो. हा अनुभव सध्या अनेकांना येत आहे. त्यावर उपाय म्हणून आरोग्याची काळजी आपलीआपण घेणे, हाच पर्याय उरतो. 

सत्काराला बोलावलं अन् पदाधिकारीचं गायब

  • रुग्ण एक 

39 वर्षांचा तरुण अभियंता. दोन दिवस ताप आला. जेवन जात नव्हते. अशक्तपणा आलेला. रात्रीचे साडेअकरा वाजलेले. कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात नेले. तेथील कर्मचारी दाखल करून घेत नव्हते. खूप विनंती केल्यानंतर एक्‍स-रे काढला. तो नॉर्मल आला. कोरोनासाठी अँटिजेन टेस्ट केली. ती निगेटिव्ह आल्याने स्वॅब घेतला. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. नंतर डॉक्‍टरांनी तपासले. प्लेटलेटस्‌ व डेंगीची तपासणी केली. तेही निगेटिव्ह आली. त्यामुळे चिकुनगुणियाची चाचणी करायला सांगितले. ती मात्र पॉझिटिव्ह आली आणि औषधोपचार सुरू केले. तरुणाला बरे वाटायला लागले. सुमारे साडेदहा हजार रुपये खर्च झाले होते. 

  • रुग्ण दोन 

पन्नाशीतील व्यक्ती. आधी थंडी वाजून आली. त्यानंतर ताप भरला. डोके व अंगदुखीचा खूप त्रास होता. डॉक्‍टरांनी गोळ्या दिल्या आणि रक्त व लघवी तपासायचे सांगितले. लघवीच्या रिपोर्टमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसले. त्यानंतर डेंगी व रक्तातील साखरेचे प्रमाण पाहण्यासाठी तपासणी केली. डेंगीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, साखरेचे प्रमाण वाढलेले होते. परंतु, अंगदुखी व ताप कशामुळे हे पाहण्यासाठी टायफायडची तपासणी केली. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि डॉक्‍टरांनी गोळ्या बदलून दिल्या. दुसऱ्याच दिवशी अंगदुखचे प्रमाण कमी झाले होते. वेगवेगळ्या तपासण्यांचा खर्च मात्र सात हजारांपर्यंत झाला होता. 

'बीएसएनएल है, तो भरोसा है' असं म्हणणाऱ्या 'बीएसएनएल'कडूनच ग्राहकांना मनस्ताप

रुग्णांचे नातेवाईक म्हणतात... 

सध्या कोरोनामुळे सामान्य रुग्णांची परिस्थिती अतिशय भयानक आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाईकांना सगळीकडे भटकण्याची वेळ आली आहे. सरकार रोज खासगी दवाखान्यांना इशारा देत आहेत. त्याचा त्यांच्यावर तसूभरही फरक पडत नाही. शिवाय, लॉकडाउनमुळे डॉक्‍टरांची फारशी कमाई न झाल्याने वेगवेगळ्या तपासण्या करायला लावून लूट सुरू आहे. त्यातून नुकसान भरून काढत आहेत. त्याला कोणीही रोखू शकत नाही. केवळ पैशांसाठी रुग्णांची ससेहोलपट चालली आहे. त्यामुळे आजारी पडलो तर काय करायचे? याची काळजी वाटते, अशी संतप्त भावना निवृत्त शिक्षक पी. आर. लांडगे यांनी व्यक्त केली. 

#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)

डॉक्‍टर म्हणतात... 

कोरोनाची लक्षणे फ्लूसारखी म्हणजे अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, कफ होणे अशी आहेत. त्यामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुणिया असा व्याधींचे निदान होण्यासाठी तपासण्या आवश्‍यक असतात. रक्त, लघवी या प्राथमिक तपासण्या आहेत. यातूनही निदान न झाल्यास अन्य तपासण्या कराव्या लागतात. हिमोग्राम, तांबड्या व पांढऱ्या पेशी, प्लेटलेटस्‌चे प्रमाण कळते. न्युमोनियाचे प्रमाण पाहण्यासाठी छातीचा एक्‍स-रे व फुफ्फुसाची तपासणी करावी लागते. कोरोनाची अँटिजेन टेस्ट रक्त व स्वॅबद्वारे करतात. ती निगेटिव्ह आल्यास स्वॅब (आरटीपीएसआर) घेऊन तपासणी केली जाते. निदानानुसार व्याधींवर उपचार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने तपासण्या कराव्या लागतात, असे निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले. 
 

loading image
go to top