गणेश विसर्जनानिमित्त तळेगावातील वाहतुक मार्गात बदल

तळेगाव दाभाडे परिसरातील सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी तळेगाव-चाकण महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच वाहतुक कोंडी निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता.
transport routes Change
transport routes Changesakal
Summary

तळेगाव दाभाडे परिसरातील सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी तळेगाव-चाकण महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच वाहतुक कोंडी निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता.

तळेगाव स्टेशन - गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी मंगळवारी (ता. ०६) तळेगाव दाभाडे शहर आणि लगतच्या परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे आणि घरगुती गणेशमुर्तींचे रोजी विसर्जन मिरवणुक असल्याने, मंगळवारी (ता.०६) दुपारी २ पासून बुधवारी पहाटे २ पर्यंत तळेगाव-चाकण महामार्गावरील जड,अवजड वाहनांची वाहतूक तळेगाव एमआयडीसीमार्गे वळवण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे परिसरातील सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी तळेगाव-चाकण महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच वाहतुक कोंडी निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने यापूर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करुन तात्पुरत्या स्वरुपात मंगळवारी (ता.०६)  दुपारी २ ते बुधवारी (ता.०७) पहाटे २ वाजेपर्यंत वरीलप्रमाणे वाहतुक वळविण्यात आली आहे.

वडगाव बाजूने तळेगाव ते चाकण रस्त्यावरुन जाणा-या सर्व प्रकारच्या जड,अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, पर्यायी मार्ग म्हणून तळेगाव एमआयडीसी फाटा- नवलाख उंब्रे-शिंदेवासुली आंबेठाण चौकी मार्गे इच्छितस्थळी जातील.मुंबईकडे चाकण ते तळेगाव रस्त्यावरुन जाणा-या सर्व प्रकारच्या जड,अवजड वाहनांना प्रवेश बंदी असून,पर्यायी मार्ग म्हणून चाकण-आंबेठाण चौक-शिंदेवासुली-नवलाख उंब्रे-तळेगाव एमआयडीसी फाटा-वडगाव मार्गे इच्छितस्थळी जातील.अत्यावश्यक सेवेतील वाहने फायरब्रिगेड, पोलीस वाहने,रुग्णवाहीकांना यातून सुट देण्यात आली आहे.

वाहनचालक आणि वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com