esakal | निगडीत पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; 10 जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

The gang attacked by sharp weapon the boy in pimpri

बुधवारी (ता.23) रात्री साडेनऊच्या सुमारास यमुनानगरमधील सेक्‍टर 21 येथील ठाकरे उद्यानाच्या पाठीमागे फिर्यादी व त्यांची मैत्रीण हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी शाहीद शेख व आकाश दोडमणी यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले.

निगडीत पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; 10 जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दहा जणांच्या टोळक्‍याने तरूणावर हल्ला केला. कोयत्याने वार करीत दगड, विटांनी मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना निगडीतील यमुनानगर येथे घडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

शाहीद शेख (रा. अंकुश चौकाजवळ, ओटास्कीम, निगडी), आकाश बसुराज दोडमणी (वय 24, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, ओटास्कीम), सातलिंग सिद्धराम संगळगी (वय 18, रा. राजनगर, ओटास्कीम), आदेश माने, मारूती धोत्रे, ओंकार दाहिंजे (सर्व रा. राजनगर, ओटास्कीम), भारत कांबळे (रा. दळवीनगर झोपडपट्टी ओटास्कीम), अजय देवकर, अजय केशव यांच्यावर गुन्हा दाखल असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

याप्रकरणी अख्तर उर्फ मुन्ना जमालउद्दीन शेख (वय 31, रा. श्री दत्तकृपा हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता.23) रात्री साडेनऊच्या सुमारास यमुनानगरमधील सेक्‍टर 21 येथील ठाकरे उद्यानाच्या पाठीमागे फिर्यादी व त्यांची मैत्रीण हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी शाहीद शेख व आकाश दोडमणी यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर इतर आरोपींनीही फिर्यादीला लाथाबुक्‍क्‍यांनी तसेच दगड व विटांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला, पायाला, डोळ्याला गंभीर इजा झाली. तसेच त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top