पिंपरी : महापालिकेतर्फे गणेश विसर्जन व्यवस्था १०७ ठिकाणी; ही आहेत ठिकाणे

पिंपरी महापालिकेतर्फे शहरातील गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. मूर्ती संकलनासाठी स्वतंत्र सजविलेले रथ तयार केले असून, नजीकच्या ठिकाणी त्याची व्यवस्था केली आहे.
Ganpati Immersion
Ganpati ImmersionSakal

पिंपरी - महापालिकेतर्फे शहरातील गणेश विसर्जनासाठी (Ganpati Immersion) १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची (Idol Collection) व्यवस्था केली आहे. मूर्ती संकलनासाठी स्वतंत्र सजविलेले रथ तयार केले असून, नजीकच्या ठिकाणी त्याची व्यवस्था केली आहे. सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती द्याव्यात, असे आवाहन महापौर ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सर्व विसर्जन घाट व हौदांवर कोरोनामुळे निर्बंध आहेत. गणेशोत्सव साध्या पद्धतीने व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा व्हावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील विविध भागामध्ये मूर्ती संकलनाची व्यवस्था पालिकेने केली असून, त्याचे विधीवत विसर्जन होणार आहे.

Ganpati Immersion
भाजप नगरसेविकेसह दहा जणांना न्यायालयीन कोठडी

अ प्रभाग

प्रभाग क्रमांक १० : साई उद्यान संभाजीनगर, शिवसाई उद्यान शाहूनगर, पिरॅमिड हॅाल शाहू उद्यान शाहूनगर, कापसे उद्यान मोरवाडी.

प्रभाग क्रमांक १४ : विठ्ठल मंदिर आकुर्डी, सेंट उर्सुला स्कूल प्रवेशद्वार आकुर्डी, काळभोरनगर दुर्गे चौक, मोहननगर सांस्कृतिक भवन.

प्रभाग क्रमांक १५ : गणेश तलावाजवळ प्राधिकरण, नियोजित महापौर निवास मैदान सेक्टर २७ प्राधिकरण, खानदेश मित्र मंडळाजवळ काचघर चौक प्राधिकरण, पांडुरंग बुवा काळभोर सभागृहाजवळ, आकुर्डी.

प्रभाग क्रमांक १९ : पिंपरी भाजी मंडई पार्किंगजवळ, एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाखाली, मदर तेरेसा उड्डाणपूल हॉटेल ईगलजवळ लिंक रोड चिंचवड, सुंदरबनजवळ सुदर्शननगर चिंचवड.

ब प्रभाग

प्रभाग क्रमांक १६ : पंचशील चौक किवळे, मुकाई चौक, जाधवघाट रावेत, नेटके कॅार्नर विकासनगर किवळे.

प्रभाग क्रमांक १७ : प्रेमलोक पार्कजवळ, हनुमान स्वीटजवळ बिजलीनगर, चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी, शिवाजी चौक वाल्हेकरवाडी, गुरूमैय्या शाळेजवळ, चिंचवडेनगर.

प्रभाग क्रमांक १८ : केशवनगर घाट, चिंचवड हॅाटेल रिव्हरविव्हजवळ पवना नदीघाट, धनेश्‍वरमंदिराजवळ चिंचवडगाव.

प्रभाग क्रमांक २२ : स्मशानभूमी घाट काळेवाडी, इंद्रप्रस्थ कॉलनी अयप्पा मंदिर रोड काळेवाडी, ज्योतिबा उद्यान काळेवाडी.

Ganpati Immersion
कोरोनामुळे गणपती विसर्जन करा घरच्या घरी

क प्रभाग

प्रभाग क्रमांक २ : चिखली गावठाण स्मशानभूमी घाट हॉल, मोशी इंद्रायणीनदी घाट.

प्रभाग क्रमांक ६ : अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील मैदान भोसरी, बाबा आनंद मंगल कार्यालयाजवळ धावडेवस्ती, महादेव मंदिरामागे चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर महादेव मंदिराजवळ गुळवेवस्ती कॉर्नर.

ड प्रभाग

प्रभाग क्रमांक २५ : मनपा शाळा पुनावळे, ताथवडे शाळा, मनपा शाळा वाकड चौक वाकड, मनपा शाळा भूमकर वस्ती वाकड, विनोदेवस्ती खाण.

प्रभाग क्रमांक २६ : मनपा शाळा पिंपळे निलख, विद्याविनय निकेतन विद्यालय विशालनगर पिंपळे निलख, मनपा शाळा कस्पटेवस्ती वाकड.

प्रभाग क्रमांक २८ : दत्त मंदिराजवळ पवनानदीलगत पिंपळे सौदागर.

प्रभाग क्रमांक २९ : मनपा माध्यमिक विद्यालय जुनी इमारत पिंपळे गुरव, बीआरटीएस पार्किंग कल्पतरू सोसायटीजवळ पिंपळेगुरव, बुद्धविहाराजवळ सृष्टी चौक पिंपळे गुरव, रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव.

इ प्रभाग

प्रभाग क्रमांक ३ : मोशी गावठाण कमानीजवळ, चऱ्होली घाटाजवळ इंद्रायणी नदी, अलंकापूरम तापकीर चौक वडमुखवाडी, डुडुळगाव घाट.

प्रभाग क्रमांक ४ : डोळस मैदान दिघी गावठाण, भारतमातानगर दिघी.

प्रभाग क्रमांक ५ : सखूबाई गवळी उद्यानाजवळ भोसरी, डॉ. आंबेडकर उद्यान भोसरी, गंगोत्री पार्क.

प्रभाग क्रमांक ७ : बापूजी बुवा चौक भोसरी, पीएमटी चौक भोसरी, अग्निशमन केंद्राजवळ भोसरी, पीसीएमटी चौक गव्हाणेवस्ती भोसरी.

Ganpati Immersion
पिंपरी: अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स व किऑक्सवर होणार धडक कारवाई

फ प्रभाग

प्रभाग क्रमांक १ : इंद्रप्रस्थ गार्डनजवळ पाटीलनगर चिखली गावठाण

प्रभाग क्रमांक ११ : पूर्णानगर खाण, मनपा शाळा म्हेत्रे वस्ती.

प्रभाग क्रमांक १२ : एकता चौक रुपीनगर, तळवडे-निघोजे पुलाजवळ तळवडे, मनपा शाळेजवळ तळवडे गावठाण, सहयोगनगर गवळीशाळा रुपीनगर, टॉवरलाइन तुळजाभवानी मंदिर ताम्हाणेवस्ती.

प्रभाग क्रमांक १३ : प्रबोधनकार ठाकरे मैदान यमुनानगर, मधुकरराव पवळे क्रीडांगण निगडी.

प्रभाग क्रमांक ११ : लोहमार्ग पोलिस वसाहत कृष्णानगर.

ग प्रभाग

प्रभाग क्रमांक २१ : डीलक्स चौक पिंपरी, वैभवनगर सोसायटी बाजूची जागा पिंपरी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे.

प्रभाग क्रमांक २४ : थेरगाव गावठाण पोलिस चौकीमागे, कैलासनगर बहुउद्देशीय इमारतीसमोर, बारणे कॅार्नर पवारनगर चौक, केजूदेवी घाट दत्तनगर थेरगाव, स. न. २२ खेळाचे मैदानासमोर बनदेवनगर, गणेशनगर गणपती मंदिरासमोर थेरगाव, संतोष मंगल कार्यालयासमोर संतोषनगर थेरगाव.

प्रभाग क्रमांक २७ : छत्रपती चौक कुणाल हॉटेल रस्ता रहाटणी, महादेव मंदिर रहाटणी, छत्रपती शिवाजी महाराज चौक मनपा शाळेजवळ रहाटणी.

ह प्रभाग

प्रभाग क्रमांक २० : ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडी, एपीजे अब्दुल कलाम उद्यान महेशनगर, आरोग्य कार्यालय गोल मंडई संततुकारामनगर, बी. डी. किल्लेदार उद्यान वल्लभनगर.

प्रभाग क्रमांक ३० : मीनाताई ठाकरे शाळा फुगेवाडी, हुतात्मा भगतसिंग विद्यालय दापोडी, मनपा पाण्याची टाकी आवार गणेशनगर दापोडी.

प्रभाग क्रमांक ३१ : बॅडमिंटन हॉल पीडब्ल्यूडी ग्राउंड सांगवी, काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल पिंपळे गुरव, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, मनपा शाळा पिंपळे गुरव.

प्रभाग क्रमांक ३२ : अहिल्यादेवी होळकर शाळा जुनी सांगवी, बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव जुनी सांगवी, मल्हार गार्डन हॉल नवी सांगवी, बालाजी लॉन्स मुळारोड जुनी सांगवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com